कपाशीवरील तुडतुडे, फुलकिडे व मावा नियंत्रण व्यवस्थापन:

मावा :
ही कीड १ ते २ मि.मि. लांब असून तिचा रंग पिवळा, हिरवा किंवा काळसर असतो. ही कीड आपले सोंडे सारखे तोंड झाडाच्या व पानाच्या ग्रंथीत खुपसून रस शोषण करते. ही कीड अंगातून मधासाखा चिकट पदार्थ बाहेर फेकते. त्यावर काळी बुरशी तयार होते. या किडीमुळे पाने आकसतात व बारीक होतात.

तुडतुडे :
ही कीड पाचरीच्या आकाराची ३ ते ४ मि.मि. लांब असून तिचा रंग फिक्कट हिरवा असतो. तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूस बहुसंख्येने आढळतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे कडा पिवळसर व नंतर ताबूस होता.जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने गळून पडतात व झाडांची वाढ खुटंते.

फुलकिडे :
ही कीड फिक्कट पिवळसर रंगाची असून अत्यंत बारीक असते. त्यांच्या पंखाच्या कडा केसाळ असतात. सर्वसाधारणपणे ही कीड पानाच्या मागच्या बाजूने पापुद्रा खरवडून अन्नरस शोषण करते. त्यामुळे पाने निस्तेज होतात व तपकिरी दिसू लागतात.

एकात्मिक कीड व्यवस्थापन
बीजप्रक्रिया :बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास इमिडाक्लोप्रीड किंवा थायामिथॉक्झाम ७० डब्ल्यू.एस. ५-७ ग्रॅम प्रति किलो बियाणे बीजप्रक्रिया केलेली असते. त्यामुळे सुरुवातीला १५ ते २० दिवस रस शोषण करणा्यया किडीपासून संरक्षण मिळते. रोग व रस शोषण कीड यांना प्रतिकारक्षम किंवा सहनशील वाणांची लागवड करावी.
मित्रकिटकांना हानीकारक किटकनाशकांची फवारणी टाळावी.
सुरवातीच्या काळात इमीडाक्लोप्रीड चा वापर टाळावा.
सुरवातीच्या काळात जेवढी लांबवता येईल तेवढी लांबवावी. त्यामुळे मित्र किटकांचे संवर्धन होईल.

1) पहीली फवारणी ही ५ टक्के लिंबोळी अर्काची करावी.

किटकनाशकाची फवारणी:
1) ल्फोनीकॅमीड 50 डब्लुजी 2 ग्रॅम किंवा
2)फिप्रोनील 5 एससी 30 मिली किंवा
3)ब्रुप्रोक्झीन 25 एससी 20 मिली किंवा
4)ॲसिफेट 75 एसपी ८ ग्रॅम
5)डायफेन्थुरॉन 50 डब्लुपी 12 ग्रॅम
वरील पौकी कोणतेही एक 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.
एकाच किटकनाशकाची फवारणी दोनदा करु नये. प्रत्येक वेळेस वरील पौकी नवीन किटकनाशक निवडावे.