खोडमाशी
प्रौढ माशी आकराने लहान, चकदार काळया रंगाची असते. फक्त पाय, स्पर्शिका व पंखाच्या शिरा फिकट तपकिरी असतात. मादी माशी पानामध्ये वरच्या बाजूस अंडी घालते. अळी पान पोखरुन शिरेपर्यत पोहचून शिरेतून पानाच्या देठामध्ये शिरते. त्यानंतर खोडामध्ये शिरते. अशाप्रकारे अळी आतील भाग खात जमिनीपर्यंत पोहचते. झाड मोठे झाल्यावर वरुन या किडीचा प्रादुर्भाव जाणवत नाही. फक्त जमिनीजवळ खोडातून प्रौढ माशी निघाल्यास खोडाला छिद्र दिसते. त्यामुळे झाडाच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. फुले व शेंगा कमी लागतात. खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यावर पूर्ण झाड वाळून जाते, त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान होते.