You are currently viewing सोयाबीन पीकासाठी तन नियंत्रण

सोयाबीन पीकासाठी तन नियंत्रण

आंतरमशागत

सोयाबीन पिकास सुरवातीचे ६-७ आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरवातीला पीक तणविरहीत ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यासाठी २०-३० दिवसांनी एक कोळपणी तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी. त्याचबरोबर गरजेनुसार १-२ खुरपण्या देऊन पीक तणविरहीत ठेवावे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकामुळे चांगल्याप्रकारे सोयाबीनमधील तणांचा बंदोबस्त झाल्याचे दिसून येते.

पेरणीपूर्व

फ्लुक्लोरॅलीन १ कि./हे. किंवा ट्रायफ्लुरॅलीन १ कि./हे. यापैकी कोणतेही एक तणनाशक ६०० ते ७०० लीटर पाण्यातून मिसळून जमिनीवर सारखी फवारणी करावी व वखराची पाळी देऊन जमिनीवर मिसळून द्यावे.

उगवणपुर्व

(पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकुर जमिनीवर येण्याआधी) अलॅक्लोर २ किलो क्रियाशील घटक /हेक्टर किंवा मेटॅलॅक्लोर २ किलो क्रियाशील घटक /हेक्टर किंवा पेंडीमिथेंलीन १ किलो क्रियाशील घटक /हेक्टर प्रमाणे फवारणी करावी.

पेरणीनंतर तण उगवल्यानंतर

  1. क्रिझॅलोफॉल इथाईल ५० ग्रॅम किलो क्रियाशील घटक /हेक्टरद पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  2. इमॅझीथायपर १o टक्के एस.एल. १00 ग्रॅम केिली क्रियाशील घटक /हेक्टर पेरणीनंतर १५-२० दिवसांनी हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.