- पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घ काळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडण रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्लू.पी.) २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. (अॅग्रेस्को शिफारस)
- बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी, पायराक्लोस्त्रोबीन (२०% डब्ल्यू.जी.) १० ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन (५% डब्लू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) २० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५% ई.सी.) १० मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२% डब्लू डब्लू) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४% एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १० मिली किंवा प्रोपीनेब (७०% डब्लू.पी.) २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी