You are currently viewing हरभरा पेरणी, बिज प्रक्रीया,खते व तणनाशकाचा वापर:

हरभरा पेरणी, बिज प्रक्रीया,खते व तणनाशकाचा वापर:

हरभरा पेरणी, बिज प्रक्रीया,खते व तणनाशकाचा वापर:
पेरणीची वेळ :
हरभरा हे रबी हंगामाचे पीक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये २५ सप्टेंबरनंतर जमिनीची ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय हा वाण वापरावा. बागायती हरभरा २० ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते.
बीजप्रक्रिया :
पेरणीपुर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम बावीस्टीन किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि २५ ग्रॅम रायझोबियम आणि पी.एस.बी गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे.
खतमात्रा :
हरभ-याला हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरदाची आवश्यकता असते. घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये २ टक्के युरीयाची फवारणी करावी.
आंतरमशागत व तणनाशकाचा वापर :
पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून तण विरहीत ठेवावे. पीक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीनंतर एक खुरपणी करावी.
पेरणीनंतर व पिक उगवणीपूर्वी तणनाशकाचा वापर करायचा असल्यास पेंडिमिथीलीन ५ लीटर (स्टॉम्प ३० इ.सी) किंवा अँलाक्लोर (लासो ५० इ.सी) ३ लीटर एक हेक्टर क्षेत्राकरिता ५०० लीटर पाण्यामध्ये मिसळून अंकूर जमिनीच्या पृष्ठभागावर येण्याआधी फवारावे.
…………………………………………………..
सर्व पिकांची माहीती | शेती संदेश | शेती योजना सोबतच शेती संमंधी सर्व वस्तुंचे शेतकऱ्यांचे उत्पादने online विक्री साठी खालील लिंक व्दारे ॲप download करा अथवा. सातत्याने https://ShetiSeva.Com वेबसाईल ला भेट दयावी.
शेतीसेवा
खालिल लिंक व्दारे शेती सेवा 2.1 मोबाईल ॲप download करु शकता
https://play.google.com/store/apps/details?id=com.wShetiSeva_11999176