साेयाबीन पिक लागवडीची संपुर्ण माहीती @शेतीसेवा

सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर  महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के  सोयाबीन तेलाचा  वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के  प्रथिने सोयाबीन  पासून  उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत . कमी खर्चात  जास्तीतजास्त उत्पादन देणारे  नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. देशात सोयाबीनची उत्पादकता (१०० किलो/हेक्टर) निम्मी आहे. जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो . याशिवाय सोयाबीनपासून सोयामिल्क  ,सोया बिस्कीट ,सोयावाडीसारखे १०० च्या वर वेगवेगळे उपपदार्थ तयार करता येतात . सोयाबीन झाडाच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणूच्या गाठीद्वारे  हेक्टरी १०० किलोपर्यंत नत्र जमिनीत स्थिर होते. तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्याने सोयाबीनचा बेवड म्हणून चांगला उपयोग होतो. सोयाबीनच्या झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. सोयाबीनला निसर्गाने मानवाला दिलेली देणगी संबोधले जाते .

सोयाबीनची कमी उत्पाद्कता असण्याची प्रमुख कारणे

 1. आधुनिक लगवड़ तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे
 2. सुधारीत  जातींचा  वापर न करणे
 3. दर हेक्टरी  झाडांचीसंख्या न राखणे
 4. बीजाक्रिया न करण, उगवणशक्तीची  तपसणीं न करणे
 5. योग्य खत मात्रांचा  शिफारशीनुसार वापर नकरणे
 6. तण तसेच कीड व रोगांचा बंदोबस्त वेळेवर न करणे
 7. आंतरपीक पद्धतींचा वापर नकरणे

सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या बाबी

जमीन:

उमध्यम ते भारी , चांगला निचरा होणारी , गालाची जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी उत्तम असते . हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते . ज्या जमिनीत पाणी साठून राहते. त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही. जमिनीचा सामू ६ ते ६.५ च्या आसपास आणि विद्युतवाहकता ४.० डेसी सायमन / मीटरपेक्षा कमी असल्यास अशा जमिनीत सोयाबीनचे पिक उत्तम येते .

हवामान:

उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. तापमान १८ ते ३५ अंश से.ग्रे. मध्ये पिकाची वाढ चांगली होते. मुख्यत्वे सोयाबीन खरीप हंगामात घेतले जाते. या पिकास वार्षिक ६०० ते १००० मी.मी. पर्जन्यमानाची आवश्यकता असते.

पूर्वमशागत व भरखते :

जमीन खोल  नांगरुन उभ्या आढ्या कुळवाच्या तूंन पाळ्या र्दछन जर्णीन चांगली भुसभुशीत करावी. त्यानंतर चांगलं कुज़लल शैण्छत किंव कंपक्टि ठत ईक्टरी २५ ते  ३०गाड्या वापराव्या .

उगवणशक्ती कमी होण्याची कारणे :

1.     सोयाबीनची उगवणशक्ती साठवणुकीमध्ये  कमी होत जाते. त्यापुळे एक वर्षाच्यावर   साठवणूककेलेले  बियाणे  उगवणशक्ती तपासल्याशिवायपेरणीस वापरू नये.

2.     कडक उन्हात बियाणे  वाळवून साठवल्यास उगवणशक्तीकमी होते.

3.  मळणीयंत्राची गती ४००. आर.पी.ए. च्यावर असल्यास बीयातील अंकुरास धक्का लागतो  व त्याचा परिणाम उगवणशक्तीवर होतो.

4.     साठवणुकींमध्ये पाोत्यांची एकमेकांवर थप्पी लावल्यास खालच्या पोत्यातील  बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते .म्हणून जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी असावी .

कालावधी – खतांची मात्रा  व वेळेवर  पूस असल्यास पिक ९० ते १०० दिवसात तयार होते.

सुधारित वाण :

एम.ए.सी.एस.१३,एम.ए.सी.एस.५८ ,एम.ए.सी.एस.१२४ ,एम.ए.सी.एस.४५०,एम.ए.सी.एस.११८८,फुले कल्याणी (डी.एस.२२८),फुले अग्रणी ,जे.एस.९३-०५ ,जे.एस ९७-५२ , जे.एस ९५-६० ,एन.सी.आर ३७ एम.ए.यु.एस.-४७ , एम.ए.यु.एस.-६१,एम.ए.यु.एस.६१-२, एम.ए.यु.एस.-७१,एम.ए.यु.एस.-८१, एम.ए.यु.एस.-१५८,जे.एस.३३५, टीए.एम.एस.९८-२१

 

बियाणे प्रमाणे – सोयाबीनची उगवणशक्ती ७० टक्केच्यावर असल्यास हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे.

पेरणी :

सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे त्यासाठी वाफशावर पेरणी करावी तसेच पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावे. पेरणी 15 जून ते 15 जुले दरम्यान करावी. पेरणी ४५ x ५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे 2.5-3.5 सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

बीजप्रक्रिया :

उगवणीच्या  काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्व प्रती किलो बियाण्यास ३ ग्रम थायरम किंवा २ ग्रॅम थायरम २.५ ग्रॅम बाविस्टीन व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे शक्यतो पोत्यावर बियाने व औषधी टाकुन पोत्याच्या दोन्ही टोकास धरुन मिसळावे.

 

प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविक खताची बीजप्रक्रिया करावी.

आंतरपिके :

कोरडवाहू शेती पद्धतीत सोयाबीन पुष्कळदा सलग पीक म्हणून घेतात, परंतु आपण सलग पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

1.     बेभरवशाचे तसेच कमी पर्जन्यमान व ज्या ठिकाणी दुबार पीक घेऊ शकत नाही अशा ठिकाणी आंतरपीक पद्धतीपासून शाश्वत व स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिक असते.

2.     प्रतिकूल परिस्थितीतही कोणत्याही एका पिकाचे उत्पन्न हमखास मिळते.

3.     आंतरपिकात सोयाबीनसारख्या द्विदलवर्गीय पिकाचा समावेश असल्यास हवेतील नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.

4.     आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास तणांच्या वाढीस आळा बसतो. तसेच रोग व किडींचे प्रमाण कमी आढळून येते.

5.     जनावरांकरिता सकस चारा उपलब्ध होतो.

6.     आंतरपिकातील सोयाबीन सारखे नगदी पीक शेतक-यांच्या आर्थिक अडचणी दूर करु शकते.

7.     तूर + सोयाबीन सारख्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास देशातील डाळ व तेलवर्गीय पिकांचे उत्पादन वाढून तेल व डाळीची कमतरता भरून निघेल.

आंतरपीक पद्धती

·       तूर + सोयाबीन (१:२)

·       कपाशी + सोयाबीन (१:१) .

·       सोयाबीन + भुईमूग (१४, १:६) .

·       सोयाबीन + ज्वारी (१:२, २:२) .

·       सोयाबीन + बाजरी (२:४, २:६)

खत व्यवस्थापन :

सोयाबीन पिकास हेक्टरी 30 किलो नत्र + 60 कि. स्फुरद + 20 किलो पालाश व 30 किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावे. जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे. तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने १० किलो बोरॅक्स प्रति हे. पेरणीच्यावेळी द्यावे.

स्पुरद देण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर केल्यास अतिरीक्त गंधक देण्याची आवश्यकता नाही.

पेरणीसाठी ट्रॅक्टर चलित यंत्राचा वापर केल्यास खते बियाण्याच्या ५ ते ७ से. मी. खाली पडेल अशा पदधतीने पेरणी करावी. कोणत्याही परीस्थीतीत बियाण्यास खताचा स्पर्श होउ नये अशी काळजी घ्यावी.

खते देण्यासाठी खालील विविध पर्याय:

 • युरिया 40 कि.ग्रॅ. + 10:26:26 – 115 कि.ग्रॅ. + सिंगल सुपर फॉस्फेट – 187.5 कि.ग्रॅ
 • युरिया 16.30 कि.ग्रॅ. + 12:32:16 – 187.5 कि.ग्रॅ. + गंधक – 20 कि.ग्रॅ
 • युरिया 65 कि.ग्रॅ. +  सिंगल सुपर फॉस्फेट – 375 कि.ग्रॅ + म्युरेट ऑफ पोटॅश्‍ 50 कि.ग्रॅ
 • 15:15:15 – 200 कि.ग्रॅ. + सिंगल सुपर फॉस्फेट – 187.5 कि.ग्रॅ
 • 18:18:10 – 187.5 कि.ग्रॅ. + म्युरेट ऑफ पोटॅश्‍ 22.33 कि.ग्रॅ

तण नियंत्रण व आंतरमशागत:

सोयाबीन पिकास सुरवातीचे ६-७ आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरवातीला पीक तणविरहीत ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यासाठी २०-३० दिवसांनी एक कोळपणी तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी. त्याचबरोबर गरजेनुसार १-२ खुरपण्या देऊन पीक तणविरहीत ठेवावे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकामुळे चांगल्याप्रकारे सोयाबीनमधील तणांचा बंदोबस्त झाल्याचे दिसून येते.

पेरणीपूर्वी :फ्लुक्लोरॅलीन 0.90 कि./हे किंवा ट्रायफ्लुरॅलीन 0.90 कि./हे. . क्रियाशील घटक म्हणजेच व्यापारी प्रमाण 2 किलो प्रती हेक्टरी यापैकी कोणतेही एक तणनाशक 1000 लीटर पाण्यातून मिसळून जमिनीवर सारखी फवारणी करावी (20 मिली प्रती 10 लीटर पंपासाठी) व वखराची पाळी देऊन जमिनीवर मिसळून द्यावे.

उगवणपुर्व :(पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकुर जमिनीवर येण्याआधी) पेंडीमिथेंलीन 0.75 किलो क्रियाशील घटक /हेक्टर  म्हणजेच 2.5 कि.ग्रॅ. प्रती हेक्टरी 1000 लिटर पाण्यात फवारणी करावी (25 मिली प्रती 10 लीटर पंपासाठी) किंवा  अलॅक्लोर २ किलो क्रियाशील घटक /हेक्टर किंवा मेटॅलॅक्लोर २ किलो क्रियाशील घटक /हेक्टर प्रमाणे फवारणी करावी.

पेरणीनंतर तण उगवल्यानंतर :इमॅझीथायपर १o टक्के एस.एल. १00 ग्रॅम क्रियाशील घटक म्हणजेच 1.00 लिटर/हेक्टर (10 ते 12.50 मिली प्रती 10 लिटर पाण्यात) पेरणीनंतर १५-२० दिवसांनी हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.  क्रिझॅलोफॉल इथाईल ५० ग्रॅम किलो क्रियाशील घटक /हेक्टरद पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

किड  व्यवस्थापन :

सोयाबीनवर महाराष्ट्रात आढळणा-या किडीच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करावीतंबाखुवरील पाने खाणा-या आणि पाने गुंडाळणा-या अळ्या

बिव्हेरिया बॅसियाना / नोमुरिया रिलाई या बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. एस.एल.एन.पि.व्ही. 500 एल. ई. 20 मि.ली.  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रासायनिक पध्दती :प्रती 10 लिटर पाण्यात साध्यापंपासाठी.

 1. प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मि.ली.
 2. क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी 3 मिली
 3. इंडोक्झाकार्ब 15.8 मि.ली.
 4. स्पायनोटेरम 11.7 एससी 9 मि.ली.
 5. क्लोरोपायरीफॉस २५ इसी 20 मि. ली.
 6. इमामेक्टीन बेन्झोऐट 5 ग्रॅम 4
 7. मेथोमिल ४0 टक्के एसपी १ कि. ग्रैं.
 8. क्लोरोपायरीफॉस २o इसी १.५ ली.
 9. इथोफेनप्रॉक्स १o इसी १ ली.
 10. लम्बडा सायद्देलोश्चिन ५ टक्के सीएस ३oo मि.ली.
 11. स्पिनोसॅड ४५ एसी १२५ मि.ली.

 

खोड माशी व चक्री भुंगा :

नियंत्रणासाठी पेरणीवेळेसच 15 किलो फोरेट (10 जी) खतामंध्ये मिसळुन  देण्यात यावे. 

 • क्लोरॅट्रानीलीप्रोल 18.5 एससी किंवा 3 मिली किंवा
 • थायक्लोप्रीड 21.7 एससी 15 मिली किंवा
 • इथिऑन 50 ईसी 30 मिली
  वरील पौकी एक प्रती 10 लिटर पाण्यामंध्ये फवारणी करावी.

पाने पोखरणारी अळी :पाण्यात मिसळणारी 50 टक्के कार्बारील भुकटी प्रती हेक्टरी 2 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावी. ट्रायझेफॉस ४० टक्के इसी 12.5 मि.ली. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी आणि पीक फुलो-यात असताना 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

सोयाबीन रोग नियंत्रण:

या पिकावर केवडा, तांबेरा, देवी, मूळकुजव्या इ. रोग येतात.

रोगाच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हेक्झाकोनेझोल 5 इसी 800 मिली लिटर  किंवा प्रॉपिकोनॅझोल २५ इसी 800 मिली (प्रतिबंधात्मक) या बुरशीनाशकांची प्रती हेक्टरी 800 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मॅन्कोझेब  75 डब्लूपी 2.5 कि. ग्रॅ.  1000 लिटर पण्यात मिसळुन फवारणी करावी.  

पिकाची काढणी, मळणी व उत्पादन :

जेव्हा झाडावरील पाने पिवळी पडून गळल्यानंतर आणि ९५ टक्के शेंगा तपकिरी रंगाच्या झाल्यावर काढणी करावी. काढणीस उशीर झाल्यास शेंगा झाडावरच तडकून बी बाहेर पडते व उत्पादनाचे नुकसान होते. काढणी केल्यानंतर मळणीयंत्राच्या सहाय्याने मळणी करून घ्यावी.

उत्पादन : सोयाबीनपासून हेक्टरी २५ ते ३० किंटल उत्पादन मिळते.