You are currently viewing गहु पेरणी, बिज प्रक्रीया, खते व तणनाशकाचा वापर बाबत महत्वाची माहीती

गहु पेरणी, बिज प्रक्रीया, खते व तणनाशकाचा वापर बाबत महत्वाची माहीती

गहु पेरणी, बिज प्रक्रीया, खते व तणनाशकाचा वापर बाबत महत्वाची माहीती:
पेरणी दोन ओळीतील अंतर २२.५ ते २३.० सें.मी. ठेवून करावी. बी ५ ते ६ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नका.
उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाडी पाभरीने करावी. म्हणजे पेरणीबरोबरचा रासायनिक खताचा पहिला हप्ता देता येईल.
जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ३.० मीटर रूंदीचे सारे पाडावेत व आडव्या दिशेने पाट पाडावेत.
बियाणे – गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी २० ते २२ लक्ष झाडांची संख्या असणे आवश्यक आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये पेरताना हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे.
उशीरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे आणि पेरणी १८ सें.मी. अंतरावर करावी.
जिरायत गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे व २२.५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
बिज प्रक्रीया :
पेरणीपूर्वी बियाण्यावर कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रती किलो बियाने या प्रमाणात प्रक्रीया करावी तसेच अँझोटोबँक्टर आणि स्फुरद विरघळविणा-या जीवाणुंची २५० ग्रँम प्रती १० किलो याप्रमाणे बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.
खते

हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत कुळवाच्या पाळीने मिसळावे.
बागायती गव्हास वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपुर्ण स्फुरद व पालाश पेरणीचेवेळी पेरून द्यावे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर द्यावे. खालील प्रमाणे खताचे वेगवेगळे पर्याय>>
युरीया 260 किलो : एस एस पी 375 किलो : मु.ऑ. पोटॅश 100 किलो
डी.ए.पी. 130 किलो : युरीया 210 किलो : मु.ऑ. पोटॅश 100 किलो
17:17:17 352 किलो : युरीया 130 किलो
20:20:20 300 किलो : युरीया 130 किलो
19:19:19 316 किलो : युरीया 130 किलो
10:26:26 230 किलो : युरीया 211 किलो
उशीरा पेरणीसाठी हेक्टरी ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश ही खते वरीलप्रमाणेच दोन हप्त्यात द्यावे.
जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे.
पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर आणि सफुरद विरघळविणा-या जीवाणुंची २५० ग्रँम प्रती १० किलो याप्रमाणे बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.
आंतरमशागत व तण नियंत्रणाचा वापर :
पेरणीपासून ३० ते ४० दिवसाचे आत तणाचे प्रमाण लक्षात घेवून एक किवा दोन वेळा निंदण करावे. रूंद पानी तणांच्या बंदोबस्तासाठी तणे २ ते ३ पाणाच्या अवस्थेत मेटसल्फयुरॉन मिथाईल (20 टक्के) हेक्टरी 20 ग्रॅम प्रती 800 लिटर पाण्यात मिसळून अंदाजे ही फवारणी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी करावी.

सर्व पिकांची माहीती | शेती संदेश | शेती योजना | सोबतच शेती संमंधी सर्व वस्तुंचे व शेतकऱ्यांचे उत्पादने online विक्री साठी खालील लिंक व्दारे ॲप download करा अथवा. सातत्याने https://ShetiSeva.Com वेबसाईल ला भेट दयावी.
शेती सेवा 2.1 ॲप आता गुगल प्ले स्टोर वर..
2MB पेक्षा लहान, विना जाहीरात, अतशिय सोपे- आपल्या मोबाईल मंध्ये नेहमीसाठी असायलाय हवे…
शेती तंत्राज्ञान | शेती संदेश | शेती योजना – सोबतच आता + आपली उत्पादने online Sale करण्यासाठी नेहमीसाठी Farmers-Direct-Sale Online-Shop तेही 100 % Online सर्व अंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधेसह.

खालील लिंक वर क्लिक करुन Download करा >>
https://play.google.com/store/apps/details?id=com.wShetiSeva_11999176

whats app: 8888456301